PuneRé प्रतिज्ञा

PuneRé प्रतिज्ञा

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (PuneRé)
पुणे महानगरपालिका

प्रिय पुणेकरांनो,

पुणे शहराचे मुळा-मुठा नदीने मातेप्रमाणे पाणी आणि जीवन देऊन पालनपोषण केले आहे. पुणे महानगरपालिकेने मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा सर्व नागरिक पुणे महानगरपालिकेसोबत एकत्र येऊन या प्रकल्पाला पाठिंबा देत आपल्या प्रिय पुणे शहराबद्दलचे कर्तव्य पार पाडतील, आणि "PuneRé - Helping Pune Re-pair, Re-novate & Re-juvenate" यासाठी पुढे येतील. कृपया या प्रकल्पाला पाठिंबा देण्याची शपथ घेण्यासाठी आपला अमुल्य असा दोन मिनिटे वेळ द्या.

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्दिष्ट पुणे शहराला खालील फायदे मिळवून देण्याचे आहे. यापैकी कोणता फायदा तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या भावी पिढीसाठी उपयुक्त वाटतो. योग्य पर्यायासमोर ✓ खूण करा

PuneRé प्रतिज्ञा

योग्य पर्यायासमोर ✓ खूण करा.

मी पाणी वाया घालवणार नाही , असे वचन देतो.

मी माझ्या कौटुंबिक मित्रांना, आणि शेजाऱ्यांना पाण्याचा सुज्ञपणे वापर करावा, यासाठी प्रेरित करण्याचे वचन देतो.

मी प्रतिज्ञा करतो की नद्या प्रदूषित करणार नाही आणि इतरांना असे करण्यापासून प्रतिबंधित करेल .

मी तलाव आणि नद्यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्याचे वचन देतो.